Thursday, October 10, 2024

 वृत्त क्र. 929

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल

पात्र लाभार्थ्यांची रेल्वे 12 ऐवजी आता 23 ऑक्टोबरला नांदेडहून होणार रवाना

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :-  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी नांदेड येथून अयोध्या धामला जाण्यासाठी निघणार होती. परंतु या नियोजनात अंशत: बदल होवून ही रेल्वे  आता 23 ऑक्टोबर 2024 रोजी रवाना होणार आहे. या योजनेतील अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत यापूर्वी 12 ऑक्टोबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे नियोजित होती. परंतु समाज कल्याण आयुक्त पुणे यांचे निर्देश व इंडियन रेल्वे ॲन्ड केटरींग ॲन्ड टूरीझम कॉपोरेशन लि. यांचे सुधारित वेळापत्रकानुसार या यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल करुन आता ही यात्रा 23 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्या धाम येथे जाणार आहे.

राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घेवून  23 आक्टोंबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे निघणार असून 28 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्या धाम येथून परत येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...