वृत्त क्र. 926
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 11 ऑक्टोंबर 2024 रोजी अमरावती येथून शासकीय विमानाने दुपारी 4.05 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 4.10 वा. नांदेड विमानतळ येथून वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 4.20 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 ते सायं. 6.30 वाजेपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट व संवाद साधतील. सायं. 6.30 ते 7 वाजेपर्यंत राखीव. रात्री 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. रात्री 7.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. रात्री 7.15 वा. नांदेड विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment