जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय,
खाजगी आस्थापनांची माहिती होणार अद्यावत
नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना (सर्व शाळा, महाविद्यालय) यांची माहिती अद्यावत करण्यात येत आहे. यात आस्थापनाचे नाव, नोंदणी क्रमांक, अधिकाऱ्यांचे नाव / पदनाम, ईमेल आयडी, पॅन / टॅन क्रमांक, स्थापना वर्षे, दुरध्वनी / मोबाईल क्रमांक, संपर्क पत्ता, कामाचे स्वरूप/ प्रमुख कार्य, अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या ही माहिती nandedrojgar@gmail.com या ईमेलवर पाठविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
राज्य शासनाचा पूर्वीचा रोजगार व स्वयंरोजगार व सध्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे असलेल्या सर्व आस्थापनांची नोंद रोजगार पोर्टलचे एनसीएस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे. यात उद्योजक/ नियोक्ते यांचा डेटा एनसीएस पोर्टलवर अपेड करत असतांना उद्योजक / नियोक्ते यांच्या डेटामध्ये उद्योग क्षेत्र, नाव, कामाचे स्वरूप, संस्था पॅन/टॅन, सिटी आयडी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती उपलब्ध नसल्याबाबत ई-मेल अन्वये तांत्रिक तज्ज्ञ www.mahaswayam.in.gov.in महास्वयम वेबपोर्टल यांनी कळविले आहे. सदर माहिती निरंक असल्याने या उद्योजक / नियोक्ते यांची माहिती एनसीएस पोर्टलवर अपडेट होण्यास अडचण येत आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी याबाबतची माहिती तात्काळ nandedrojgar@gmail.com या ईमेलवर पाठवावी. माहिती अद्यावत करतांना काही अडचन आल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 9975646466 वर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment