केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सुधारित दौरा
नांदेड (जिमाका) दि. 27 :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून ओखा एक्सप्रेसने सकाळी 6 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.20 वा. रेल्वे स्टेशनहून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह येथून नियोजन भवनकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन मुख्य सभागृह येथे आगमन व सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रोजगार मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2 वा. नियोजन भवन मुख्य सभागृह येथून नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. दुपारी 3 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. दुपारी 3.30 वा. पुणे एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment