Friday, February 16, 2024

 वृत्त क्र. 136 

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी लातूर ला 24 ला

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा

नांदेड (जिमाका) दि. 16 :- सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना मोठया प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लातूर येथे 24 फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभाग नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

या मेळाव्याचे उत्तम रितीने नियोजन करावे यादृष्टीने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विभागीय आयुक्त कार्यालय, छ.संभाजीनगर येथे बैठक घेतली. या बैठकीस लातूरचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातूरच्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी व  कार्यकारी अभियंता छ. संभाजीनगर, छ.संभाजीनगर येथील प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, उपआयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, कामगार उपआयुक्त, छ.संभाजी नगर, सहायक आयुक्त लातूर, सहसंचालक तंत्रशिक्षण, सहसंचालक उच्चशिक्षण, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था, प्रादेशिक उपआयुक्त, सामाजिक न्याय विभाग, छ.संभाजीनगर/लातूर सहसंचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ छ.संभाजीनगर व विभागातील इतर सर्व जिल्हयाचे जिल्हाधिकारी व सहायक आयुक्त हे दुरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.  

या नमो महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नियोक्ता, बँकींग लॉजीस्टीक, सेल्फ मार्केटिंग हॉस्पीटॅलीटी, आरोग्य सेवा, पुरवठा साखळी, उत्पादन, स्मार्ट प्रकल्प यासारख्या विभागाचा समावेश आहे. नमो महारोजगार मेळाव्यासाठी बंदिस्त दालन स्टॉल उभारणे, पिण्याचे पाणी, साहित्य सामग्री, स्वच्छता, पाणी, विज, शौचालय, वाहनतळ आणि वाहतूक व्यवस्था आदी सुविधाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

00000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...