वृत्त क्र. 139
महासंस्कृती महोत्सवातील शिवकालीन खेळांच्या स्पर्धेचा निकाल जाहिर
· विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण
नांदेड (जिमाका) दि. 16 :- संपूर्ण महाराष्ट्रात वेगळा प्रयोग म्हणून नांदेडच्या महासंस्कृती महोत्सवातील शिवकालीन साहसी व चित्तथरारक खेळाच्या सत्राचा समारोप बक्षीस वितरणाने झाला. पोलीस कवायत मैदानावर सायंकाळी चार वाजता हा बक्षीस समारंभ पार पडला.
क्रीडा स्पर्धाना 15 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे सुरवात झाली होती . पारंपारिक वाद्यांच्या गजरात खो-खो, कबड्डी, लेझीम, कुस्ती, मल्लखांब, आटया-पाटया, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी या खेळांच्या चित्तथरारक व रोमहर्षक प्रात्यक्षिकांनी झाली होती. या खेळांच्या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांना आज निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते बक्षिस देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, तहसीलदार संजय वारकड, क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार आदीची उपस्थिती होती.
जिल्हास्तरीय महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन पारंपारिक खेळ स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे आहे. लेझीम स्पर्धा (महिला गट) प्रथम महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड, द्वितीय महात्मा फुले हायस्कूल विजय नगर नांदेड, तृतीय श्रीनिकेतन हायस्कूल दिपनगर नांदेड.
आट्या पाट्या (महिला)- प्रथम शांतिनिकेतन हायस्कूल नांदेड, द्वितीय जिल्हा परिषद हायस्कूल वाघी, तृतीय विद्याभारती स्कूल उमरी.
आट्यापाट्या (पुरुष गट) प्रथम विद्याभारती स्कूल उमरी, द्वितीय श्रीनिकेतन हायस्कूल नांदेड, तृतीय जिल्हा परिषद हायस्कूल वाघी.
कबड्डी (पुरुष गट) प्रथम इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय मेंढला तालुका मुदखेड, व्दितीय शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दुधड तालुका हिमायतनगर, तृतीय बसवेश्वर हायस्कूल कामठा तालुका अर्धापूर.
कबड्डी (महिला गट) प्रथम इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय मेंढला तालुका मुदखेड, द्वितीय शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दुधड तालुका हिमायतनगर, तृतीय लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद.
लाठीकाठी स्पर्धा- (मुले डबल)- प्रथम- गौतम संघपाल भंडारे, द्वितीय प्रेम नारायण कांबळे, तृतीय शिवकांत सुनील गुंडले, लाठीकाठी (मुली डबल)- प्रथम सावली सूर्यकांत थोरात, श्रद्धा धम्मानंद जोंधळे द्वितीय तर तृतीय शुभांगी मारुती आरोळे.
लाठीकाठी (सिंगल मुले गट) प्रथम विजय शिवाजी तेलंग, द्वितीय संस्कार सोपान शेळके, तृतीय भावेश संघरत्न सोनसळे. लाठीकाठी (मुली सिंगल) प्रथम सुप्रिया संजय शिंदे, द्वितीय मयुशे भीमराव निखाते, तृतीय अस्मिता जीवन जाधव.
लगोरी (मुले) प्रथम इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल नांदेड, द्वितीय संजय गांधी हायस्कूल भोगाव तालुका जिल्हा नांदेड, तृतीय एकनाथ पाटील अकॅडमी नवीन मोंढा नांदेड,
लगोरी (मुली गट) प्रथम इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल नांदेड, द्वितीय एकनाथ पाटील अकॅडमी नवीन मोंढा नांदेड, तृतीय एकनाथ पाटील अकॅडमी नवीन मोंढा नांदेड.
गतका- प्रथम हरप्रीतसिंघ, द्वितीय हरजींदरसिंघ, तृतीय हरविंदरसिंघ. गतका एक अंगी- प्रथम जसदीपसिंघ, द्वितीय निशानासिंघ, तृतीय रणजीतसिंघ.
खो खो मुले संघ- प्रथम जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा, व्दितीय- इंदिरा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सिडको नवीन नांदेड, तृतीय शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड तालुका हिमायतनगर,
खो-खो (मुली संघ) प्रथम जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा पारडी तालुका लोहा, व्दितीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरटवाडी तालुका हदगाव, तृतीय शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड तालुका हिमायतनगर.
मल्लखांब पुरलेला (मुले गट) प्रथम शैलेश सुरेश मद्दलवार, द्वितीय कृष्णा किशोर जाधव व तृतीय सुगत प्रल्हादराव सोनटक्के. रोप मल्लखांब (मुली) प्रथम पूजा गंगाधर शिरगिरे, द्वितीय क्रिपा मनोज शितळे, तृतीय श्रद्धा चंद्रकांत फुगारे.
रस्सीखेच (पुरुष) प्रथम जय शिवराय संघ ईजळी, द्वितीय मनकामेश्वर संघ देगाव, तृतीय आर.आर.संघ सिडको. रस्सीखेच (महिला) प्रथम राणीलक्ष्मीबाई संघ, सिडको नवीन नांदेड, द्वितीय मुक्ता साळवे संघ साठेनगर नांदेड, तृतीय सावित्रीबाई फुले संघ देगाव नांदेड .
00000
No comments:
Post a Comment