Wednesday, December 4, 2019


 पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीस
पात्र ठरलेल्यांसाठी अभिरुप मुलाखतीचे आयोजन

     नांदेड दि. 4 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या नांदेड जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी अभिरुप (मॉक) मुलाखतीचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे शनिवार 7 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
उज्वल नांदेड या नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून अभिरुप (मॉक) मुखलखतीचा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता यावे यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. या अभिरुप मुलाखतीमध्ये पॅनल सदस्य म्हणुन मनोहर भोळे, डॉ. अभिजीत फस्के  पोलीस उपअधिक्षक, रोहीत काटकर सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी, बालाजी चंदेल (पो.नि) मुख्य गुप्त वार्ता अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडाटासह नाव नोंदणी सेतु समिती संचलीत स्पर्धा परिक्षा अभ्यासिका, श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडीयम परिसर नांदेड येथे करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...