Wednesday, December 4, 2019


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शिबिराचे आज आयोजन
नांदेड, दि. 4 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने  गुरुवार 5 डिंसेबर रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर हे 5 डिंसेबर 2019 रोजी सकाळी 10 ते 5या वेळात पुणे येथील प्रा. सचिन ढवळे हे  गणीत व बुध्दीमत्ता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ  यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या मार्गदर्शन ‍शिबिरास स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक नांदेडमध्ये १४ वर्षीय प्रणव मेंडके बेपत्ता ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन नांदेड, दि. २८ ऑक्टोबर : नांदेड शहरातील भाग्यनगर प...