Friday, November 17, 2023

रब्बी हंगामासाठी निम्म मानार प्रकल्पातून पहिली पाणी पाळी 25 नोव्हेंबर पासून सुरु

 रब्बी हंगामासाठी निम्म मानार प्रकल्पातून पहिली पाणी पाळी 25 नोव्हेंबर पासून सुरु 


नांदेड (जिमाका) 17 :- जिल्ह्यातील निम्न मानार प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेवून रब्बी हंगाम 2023 साठी तीन पाणीपाळया देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निम्न मानार प्रकल्पातून प्रथम रब्बी हंगामासाठी पाणी पाळी 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व बागायतदारांनी पाटबंधारे शाखेत रितसर पाणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरुन सिंचनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. 

निम्न मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांनी  रब्बी हंगामी, दुहंगामी तसेच हंगामातील इतर उभी पिके या पिकासाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यातील उपसा, नदीनाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना नंबर 7,  7() 7() मध्ये पाणी अर्ज सादर करावेत. 

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेवूनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाळी 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. निम्न मानार प्रकल्प गोदावरी शाखा कालवा क्रं. 1, कालवा क्र. 2 व डावा कालवा, उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचनालयाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. रब्बी हंगाम सन 2023-24 मधील पाणीपाळीचा प्रस्तावित नियोजन पुढीलप्रमाणे आहे. आवर्तन क्र. 1 चा कालावधी 25 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 पर्यत आहे. आवर्तन क्र. 2 चा कालावधी 30 डिसेंबर ते 13 जानेवारी  2024 असून आवर्तन क्र. 3 चा कालावधी 29 जानेवारी 2024  ते 13 फेब्रुवारी 2024 असा प्रस्तावित आहे.

पाऊस व आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होवू शकतो. तरी प्रकल्प क्षेत्रातील सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावीअसे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता आ.शि. चौगुले यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...