Tuesday, August 24, 2021

 

नांदेड जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एकलव्य निवासी शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू

अनुसूचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेमध्ये (एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कुल) प्रवेश इयत्ता 6 वीच्या वर्गासाठी तसेच इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

ही परीक्षा कोविड-19 च्या प्रार्दुभाव मुळे रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार होती परंतू परिक्षा रद्द झाल्याने प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकिय व अनुदानीत आश्रम शाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याच्या मागील सत्राच्या (2020-21) गुणाच्या आधारे विद्यार्थ्याची निवड होणार आहे. 

इयत्ता 6 व्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्याना प्रवेश परिक्षेचे अर्ज भरावयाचे आहे त्यानी पाचव्या वर्गातील गुण भरण्याचे निर्देश शासनाकडून दिले आहेत. हा निकष इयत्ता सातवी ते नववीच्या रिक्त जागेवरील प्रवेशाबाबत लागू करण्यात आला आहे. मागील सत्रातील एकंदर 900 गुणांपैकी विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवले त्याआधारे निवड यादी जाहिर केली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या गुणाच्या ऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही. विद्यार्थ्याचा अर्ज भरताना आवेदनपत्रात दिलेला संपर्क / मोबाइल नंबर आवश्यक आहे. विद्यार्थ्याची जन्म तारीख, मागील वर्षाच्या इयतेच्या गुण पत्रीकेची प्रत आवश्यक आहे. शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याचे आवेदन पत्र भरलेले असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रीका स्वतंत्र अपलोड करावे. 

इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या रिक्त जागा भरण्यासाठी अनुसुचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आली आहेत. यासाठी htt://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्याचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापकांनी या लिंकवर अर्ज ऑनलाइन भरुन त्यासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील student id माहित असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतीम मुदत मंगळवार 31 ऑगस्ट 2021 पर्यंत राहणार आहे. 

प्रवेश अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या बाबी 

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा नोंदणी अर्ज htt://admission.emrsmaharashtra.com या लिंकवर क्लिक करुन भरावा. प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्याचा सरल / स्टुडन्ट आयडी माहित असणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थी अनुसूचित /आदिम जमातीचा असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न रुपये 6 लाखापेक्षा कमी असावे. विद्यार्थ्याची निवड मागील वर्षातील वार्षीक परिक्षेच्या गुणाच्या आधारे करण्यात येईल. विद्यार्थ्याच्या शाळेची निवड अर्जामध्ये नमुद केलेल्या पत्रानुसार करण्यात येइल. विद्यार्थ्यास एकुण 900 पैकी प्राप्त गुण नमुद करावे लागतील. त्याचप्रमाणे संबंधीत इयत्तेचे गुणपत्रक प्रवेश अर्जासोबत अंतर्भुत (अपलोड) करावे लागेल. अर्जदार विद्यार्थी आदिम जमातीचा असल्यास त्याबाबत अर्जामध्ये नोंद करण्यात यावे. अर्जदार विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबत अर्जामध्ये नोंद करण्यात यावी. अर्ज 31 ऑगस्टनंतर कुठल्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाही, असेही आवाहन केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...