Tuesday, August 24, 2021

 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कार 

नांदेड (जिमाका), दि. 24 :- एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक / विधवा यांचे पाल्य दहावी व बारावीमध्ये सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यामधून दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एका पाल्यास दिला जातो. या पुरस्काराची रक्कम 5 हजार रुपये आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

000000

 

 

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...