भूजल सर्वेक्षण व चित्ररथाचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 25 :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हयातील माळेगाव येथे
चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बालाजी कल्याणकर यांनी या चित्ररथाला
हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
दिल्या.
या कार्यक्रमाला वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, कार्यकारी अभियंता बाविस्कर, उपअभियंता संद्री, नेहरु युवा केंद्राच्या युवा
अधिकारी चंदा रावलकर, आर. व्ही. पवार, कानोडे,
गीते, भोसले, साबेर शेख,
अन्नदाते, नितीन भवानकर, जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रसेन पाटील, माळेगावचे
सरपंच हणमंत धुलगंडे, रावसाहेब धुलगंडे, माळकोळी पोलिस स्टेशनचे माणिकराव डोके, पोलिस
उपनिरिक्षक संतोष गीते, पत्रकार नागनाथ पुरी, यादव ढवळे, सग्रांम पवार, कृष्णा
केंद्र, बाबुराव बोईनवाड, तसेच गावातील
जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
यानंतर लोहा येथे चित्ररथाचे आगमन झाले. यावेळी गावातील सरपंच शंकर
माने, केशव हलगे, शुभम अकुलवार, हनमंत ढामे, दिगंबर
कौशल्ये, शशिकांत बिडवाई, केशव भोसिकर,
यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच वाडी येथे चित्ररथाच्या स्वागतासाठी
गावातील जेष्ठ नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment