Wednesday, August 25, 2021

 माहूर येथील आदिवासी मुलींचे वसतीगृहासाठी प्रवेश सुरु 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- आदिवासी विभागाच्यावतीने आदिवासी प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहेत. वसतिगृहात प्रवेशाकरिता www.swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन सुविधा दिल्या जातील. याशिवाय गणवेश भत्ता, निर्वाह व प्रसाधन भत्ता, स्टेशनरी भत्ता आदी लाभ डीबीटीमार्फत देण्यात येईल. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन माहुर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...