Monday, July 27, 2026

 वृत्त क्रमांक 

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान  

नांदेड, दि. 27 जुलै :-  मातंग बांधवांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती शनिवार 1 ऑगस्ट 2026 रोजी मोठया उत्साहात नांदेड जिल्हयात दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात येते. त्यामुळे 1 ऑगस्ट रोजी तसेच त्यानंतर 2 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुध्दा जिल्हयातील ग्रामिण भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मिरवणुका व तर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येत असते.  त्याअनुषंगाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्हयात शांतता टिकुन राहावी म्हणुन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश दिले आहे. 

30 जुलै 2026 चे 00:00 वाजता पासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 चे 24:00 वाजेपर्यत नांदेड जिल्हयात सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "" ते "" प्रमाणे पुढीलप्रमाणे लेखी किंवा तोंडी आदेश आप-आपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. 

रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्यारितीने चालावे कोणत्यारितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्ल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजे अर्चेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजाअर्चनाच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्क्यावर व धक्कयामध्ये आणि सार्वजनिक स्नांनाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकूमापेक्षा कमी दर्जाचे व त्या पुष्टी देणारे दुय्यम अधिका-यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शनपर आदेश देण्याबाबत. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचना देण्यासंबधी. 

कोणीही सदरचा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. सदर जाहिर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा येवु शकतो अशा घोषणा देऊ नयेत. 

सदरचा आदेश लग्नांच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो पोलीस कायदा, कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. सदरचा आदेश 30 जुलै 2026 चे 00:00 वाजेपासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजीचे 24:00 वाजेपर्यत लागु राहिल, असेही आदेशात पोलीस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नमूद केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

  योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे #आधार_प्रमाणीकरण ...