वृत्त क्रमांक
कृत्रिम बुद्धिमत्ता वैद्यकीय क्षेत्रासाठी ठरणार वरदान ; "Al in Medical Practice & Interesting Clinical Cases in Medicine" शैक्षणिक प्रायमर कार्यक्रम संपन्न
नांदेड, दि. 27 जुलै : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड तसेच Association of Physicians of India (API), Nanded यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या पुढाकाराने "Al in Medical Practice & Interesting Clinical Cases in Medicine " या विषयावरील शैक्षणिक प्रायमर कार्यक्रमाचे आयोजन २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ यावेळेमध्ये महाविद्यालयातील पी.एस.एम. लेक्चर हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षक, तज्ज्ञ डॉक्टर, ज्येष्ठ चिकित्सक, एम.बी.बी.एस. (UG) विद्यार्थी, इंटर्न (Intern) विद्यार्थी, पदव्युत्तर (PG) विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी "Al in Medical Practice" या विषयावर मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वैद्यकीय शिक्षण, रुग्णनिदान, संशोधन, उपचार पद्धती, क्लिनिकल प्रॅक्टिस तसेच भविष्यातील आरोग्यसेवेतील वाढता वापर आणि त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आरोग्यसेवा अधिक अचूक, जलद आणि परिणामकारक होणार असून वैद्यकीय क्षेत्रात संशोधन व निर्णयप्रक्रियेला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यानंतर डॉ. भाईमंगेश नाईक मुंबई यांनी "Interesting Clinical Cases in Medicine" या विषयावर वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ वैद्यकीय रुग्णप्रकरणांचे सादरीकरण करून त्यांचे निदान, चिकित्सकीय विचारप्रक्रिया आणि उपचार पद्धती यांचे प्रभावी विश्लेषण केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थित वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, निवासी डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभवातून महत्त्वपूर्ण ज्ञान प्राप्त झाले.
अधिष्ठाता डॉ. सुधीर बी. देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शैक्षणिक कार्यक्रमास डॉ. हेमंत गोडबोले (उपअधिष्ठाता), डॉ. अनिल देगावकर (प्राध्यापक व विभागप्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र), डॉ. इस्माईल इनामदार (विभाग प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र), डॉ. संजीव झांगडे (सहयोगी प्राध्यापक, श्वसनविकारशास्त्र), डॉ. अरविंद चव्हाण (सहयोगी प्राध्यापक, बालरोगशास्त्र), डॉ. सीमा डाके (सहाय्यक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र) तसेच डॉ. संदीप उप्पोड (सहाय्यक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र) यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, निवासी डॉक्टर, एम.बी.बी.एस. (UG) विद्यार्थी, इंटर्न (Intern) विद्यार्थी व पदव्युत्तर (PG) विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी डॉ. दिलीप म्हैसेकर (माजी कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तथा माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व माजी अधिष्ठाता), डॉ. अरुण मान्नीकर, डॉ. डी. बी. जोशी, डॉ. मापारे, डॉ. कर्मवीर, डॉ. आर. अग्रवाल, डॉ. पंतगे तसेच डॉ. अनंत सूर्यवंशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमातून आधुनिक वैद्यकीय शिक्षणात कृत्रिम
बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर, संशोधनातील
नव्या संधी तसेच क्लिनिकल निर्णयक्षमतेत होणारी सुधारणा याबाबत उपस्थितांना
मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे वैद्यकीय क्षेत्रातील
ज्ञानवृद्धी, संशोधनाला चालना तसेच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा
प्रदान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास निश्चितच मदत होईल,
असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी समुदाय वैद्यकशास्त्र ( PSM) विभागाच्या
पदव्युत्तर (PG) विद्यार्थ्यांनी नियोजन, समन्वय व व्यवस्थापनामध्ये मोलाचे योगदान दिले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment