वृत्त क्रमांक 598
जूना मोंढा ते गोदावरी नदीवरील पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग
नांदेड दि. 10 जून :- पॅकेज 154 नांदेड शहरातील जुना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रा. मा. 256 (कि.मी 42/200 ते 75/700) व 2 नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदीवरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा. 247 (०/०० ते 4/600) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजका सह संगम स्थळाची सुधारणे करणेसाठी जुना मोंढा ते गोदावरी नदी पुल या भागातील वाहतूक इतर मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबधीत विभागाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार उपाययोजना करतील या अटीवर तसेच, संबधीत विभागाने पुढील उपाययोजना करुन 15 जून 2025 पर्यंत नमुद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वाहनासाठी प्रतिबंधित करण्यात आलेला मार्ग जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय, कौठा हा आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाणे-येणे साठी जुना मोंढा -वजिराबाद –कौठा-रवीनगर-शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा याप्रमाणे राहील.
पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. ही अधिसुचना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी. ही अधिसूचना दिनांक 9 जून रोजी निर्गमीत करण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment