वृत्त क्रमांक 597
जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळला बदली
नांदेडला जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून अर्जुन झाडे
नांदेड दि. 9 जून : नांदेड जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळ येथे बदली झाली आहे. तर नांदेड येथे नूतन जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून अर्जुन झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक गट-अ संवर्गातील 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या 6 जून रोजी राज्य शासनाने केल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत सुधाकर आडे यांच्या निरोप समारंभ नुकताच घेण्यात आला. यावेळी नुतन जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोराळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रभाकर मठपती तसेच जिल्हा नियोजन समितीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे 19 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड येथे रूजू झाले होते. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून त्यांनी कोरोना काळात आरोग्य विषयक बाबींवर जिल्हाधिकारी यांच्यासोबत कोविड सेंटर उभारणे, कोरोना रुग्णांसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तात्काळ सोयी-सुविधा पुरवण्याच्या कामांना मान्यता देणे व निधी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी प्राधान्याने केली. जिल्ह्यातील नियोजन विभागात कार्यरत असताना प्रभावी नियोजन, तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन समोर ठेवून उल्लेखनीय कार्य त्यांनी केले.
दरवर्षी जिल्हा नियोजन समितीसाठी शासनाकडून अर्थसंकल्पीत तरतूद 100 टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन उत्कृष्टरित्या केले आहे.
000000
No comments:
Post a Comment