Tuesday, September 11, 2018


कापूस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी कृषि संदेश दिला आहे.
कापुस गुलाबी बोंडआळीसाठी थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम तसेच रसशोषण किडीसाठी बुप्रोफेझीन 15 टक्के अधिक असिफेट 35 टक्के डब्ल्यू पी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे.
सोयाबीन पिकावरील खोडमाशी, उंटअळी तसेच चक्रीभुंग्यासाठी थायमिथोक्झॅम 12.6 अधिक लॅमडा सॅहलोथ्रीन 9.5 झेडसी 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...