Friday, August 19, 2016

ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी संबंधीत गावातील आठवडी बाजार बंद राहणार  
नांदेड दि. 19 :- जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक  व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यासाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी संबंधीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहेत.
पणन संचालक पुणे यांनी ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीच्‍या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता  यावा  तसेच  मतदान शांततेत पार पडावे यादृष्टिकोनातून ज्‍या ग्रामपंचायतीच्‍या हद्दीत मतदान होणार आहे अशा ठिकाणचे आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आणि ते अन्‍य दिवशी भरवण्‍यास मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार  जिल्‍हा‍धिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये प्रदान अधिकाराचा वापर करुन जिल्‍ह्यातील किनवट, माहूर, उमरी, मुखेड, भोकर, हदगाव, कंधार, नांदेड या आठ तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक तसेच 49 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी ज्‍या गावी, ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्‍यात यावेत व अशा ठिकाणचे आठवडी बाजार दुस-या दिवशी गुरुवार 25 ऑगस्ट 2016 रोजी भरविण्‍यात यावेत असे आदेशात नमूद केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...