Wednesday, April 15, 2026

वृत्त 

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती 

नांदेड दि. 15 एप्रिल :- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी नांदेड या वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व माजी सैनिक अवलंबित मधून माळीचे एक पद भरण्यात येणार आहे. माजी सैनिक व माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास हे पद नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येईल. 

यासाठी वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे असून वेतन 13 हजार 271 रुपये राहील. या पदाला कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य राहील. इच्छुक उमेदवारांनी सैनिकी मुलांचे वसतिगृह नांदेड येथे सोमवार 20 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक मो. 8380873985 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...