वृत्त क्रमांक
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड
जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकाने बंद
- 21
ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजेपासून 23 ऑक्टोबरपर्यंत मद्यविक्री बंद
नांदेड (जिमाका), दि. 19: महाराष्ट्र विधानपरिषद औरंगाबाद विभाग
पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्यात
मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार
पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी
जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र
विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026
चा कार्यक्रम घोषित केला असून, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक
प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणे, आदर्श आचारसंहितेची
प्रभावी अंमलबजावणी करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवणे तसेच
सार्वजनिक शांतता अबाधित राखणे या उद्देशाने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 मधील कलम 142(1) तसेच
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसंदर्भातील निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार
नांदेड जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने दि. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4
वाजेपासून दि. 23 ऑक्टोबर, 2026 या कालावधीत मतदान संपण्यापूर्वी
48 तास अगोदर, मतदानाच्या पूर्वीचा दिवस व मतदानाच्या दिवशी बंद
ठेवण्यात येणार आहेत.
वरील कालावधीत नांदेड जिल्ह्यातील संबंधित
मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवणे बंधनकारक राहील. या
आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती
रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व
संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया
शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी तसेच मद्यविक्री
अनुज्ञप्तीधारकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन
करण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment