Saturday, November 2, 2024

 वृत्त क्र. 1021

भोकर मतदारसंघात निवडणूक खर्चाबाबत

4 नोव्हेंबरला उमेदवारांचे प्रशिक्षण   

नांदेड दि. 2 नोव्हेंबर : 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक लढविणाऱ्या, त्यांच्या खर्च प्रतिनिधींना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या तरतुदी अवगत करुन देण्यासाठी खर्च निरीक्षक यांच्या उपस्थित सोमवार 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह भोकर येथे उमेदवारांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. 

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: ,ती स्वत: किंवा त्याच्या, तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी 85-भोकर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...