Tuesday, July 16, 2024

 वृत्त क्र. 596

27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नांदेड दि 16 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई  व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणनांदेड तर्फे शनिवार  27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे.  ही राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयनांदेड येथे होत आहे.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणीमोटार अपघात दावाभूसंपादनधनादेश अनादरीत झाल्याबाबची प्रकरणे, कौटूंबिक न्यायालयातील तडजोड प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

याशिवाय, या  लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिलथकीत टेलिफोन बिल, विविध बॅंकाचे कर्ज वसुली प्रकरणेथकित पाणीबील इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या निवाड्याविरुध्द अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम 100 टक्के परत मिळते, नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोक न्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. तरी या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन सुरेखा कोसमकरनांदेड व न्यायाधीश श्रीमती डी.एम.जजसचिवजिल्हा विधी सेवा प्राधिकरणनांदेड यांनी केले आहे. सर्व पक्षकारांनी येताना त्यांनी आपले अधिकृत ओळखपत्र घेवून येणे गरजेचे असुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 27 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...