Tuesday, July 16, 2024

  वृत्त क्र. 600

दुधासाठी  पाच रुपये तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये अनुदान

नांदेडदि. 16 :-  राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी शासनाने अनुदान योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. यात दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान शासनाने जाहीर केले आहे.

दुध उत्पादक शेतकऱ्यांना कार्यरत खाजगी दुध प्रकल्प व फार्मर प्रोडयुसर कंपनी यांच्याकडे दुधाचा पुरवठा करणे बंधनकारक राहील. गाईच्या 3.5/8.5 गुण प्रतीला 30 रुपये देणे बंधनकारक राहील. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाय टॅगिंग, मोबाईल नंबर बँक खाते इ. दुध पुरवठा करणाऱ्या खाजगी दुध प्रकल्पाकडे लॉगीन करावे. ही योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीपर्यत राहील यांची नोंद दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. एस.एस. बळवंतकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...