Friday, August 28, 2020

 

                                 माजी सैनिकांना ईसीएचएस मेडीकल

कार्डस नांदेड पॉलीक्लिनीक मधून मिळणार 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- स्टेशन हेडक्वार्टर औरंगाबाद व पुणे येथील कार्यालयात माजी सैनिक संघटनेने पाठपुरावा केल्याने माजी सैनिकांचे मेडीकल कार्डस आता नांदेड येथुनच वितरणाची अनुमती प्राप्त झाली आहे. कार्डस प्राप्त करण्यासाठी  माजी सैनिकांनी त्यांच्याकडील जुने मेडीकल कार्डस, पीपीओ प्रत व ओटीपीनंबर हे ईसीएचएस पॉलिक्लिनिक नांदेड येथे जमा करावे, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी नांदेड व ईसीएचएसचे अधिकारी यांनी केले आहे. 

केंद्र सरकारची माजी सैनिकांसाठी ईसीएचएस पॉलिक्लिनिक नांदेड येथे सन 2011 पासुन सुरु आहे. या पॉलिक्लिनिकमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली व वाशिम जिल्हयातील माजी सैनिकांसाठी ओपीडी सर्व्हिसेस ज्यामधे मेडीकल स्पेशलिस्ट, डेन्टल स्पेशलिस्ट, पॅथोलोजी लॅब व औषधी उपलब्ध आहेत. तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरर्सच्या उपचारासाठी देशात विविध ठिकाणी रेफरल केले जाते. या सुविधा प्राप्त करण्यासाठी माजी सैनिकांकडे मेडीकल कार्ड असणे आवयश्यक असते. माजी सैनिकांचे मेडीकल कार्डस सध्या औरंगाबाद व अहमदनगर येथून वितरीत केले जात होते. सर्व माजी सैनिकांना औरंगाबाद व अहमदनगरला जाऊन कार्डस प्राप्त करणे शक्य नसल्याने माजी सैनिक संघटना व माजी सैनिकांनी  मेडीकल कार्डस हे नांदेड पॉलीक्लिनिक मधूनच मिळावे अशी मागणी केली होती.

000000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...