Friday, August 28, 2020

जिल्ह्यातील टंकलेखन आणि लघुलेखन

इन्स्टीट्युटला अटी व शर्तीनुसार परवानगी

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्‍हयातील शासनमान्‍य संगणक आणि लघुलेखन संस्‍था चालु करण्‍यास जिल्‍हा प्रशासनाची परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्‍यात आलेली होती. यानुसार महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परीषद पुणे यांनी शै‍क्षणिक वाणिज्‍य संस्‍था (संगणक टंकलेखन, मॅन्‍युअल टाइपिंग, लघुलेखन इत्‍यादी) कोविड प्रतिबंधक उपाययोजनेतंर्गत अटी, शर्तींच्‍या अधीन राहुन सुरु करण्‍यास परवानगी दिलेली आहे. त्‍याअर्थी नांदेड जिल्‍हयातील या संस्‍था उघण्‍यासाठी खालील अटी आणि शर्तीवर परवानगी देण्‍यात येत आहे.

·         कोव्‍हीड-19 अंतर्गत केंद्र / राज्‍य शासन यांनी वेळो वेळी दिलेल्‍या निर्देशाचे पालन करने बंधनकारक राहील.

·         जिल्‍हयातील सर्व शासनमान्‍य टंकलेखन आणि लघुलेखन इंस्टिटयुट केंद्र यांची तालुकानिहाय यादी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावी.

·         कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी (सामाजिक अंतर) प्रत्‍येक व्‍यक्‍तींमध्‍ये कमीत कमी संपर्क येईल सरवी दक्षता घ्यावी.

·         कंटेनमेंट झोन मधील व्‍यक्‍तींना या मधुन वगळण्‍यात यावे तसेच नांदेड जिल्‍हयातील कंटेनमेंट झोनमध्‍ये ये-जा करण्‍यास मनाई राहील.

·         विद्यार्थ्‍यांची उपस्थिती नोंदवही दररोज अदयावत करावी. जेणेकरुन संशयित रुग्‍ण आढळल्‍यास कॉन्‍टक्‍ट टेसिंग करणे सोईचे होईल.

·         जिल्‍हयातील सर्व वरीलप्रमाणे संस्‍था सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत व शनिवार यादिपशी सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंत सुरु राहतील आणि प्रत्‍येक रविवारी संस्‍था पुर्णत: बंद राहतील.

·         कोरोना कालावधीत ज्‍यावेळी जिल्‍हा, तालुका बंद ठेवण्‍याबाबत अथवा जमावबंदी करण्‍याबाबत किंवा लॉकडाउन घोषित करण्‍यात येईल त्‍याकालावधीत संस्‍था बंद ठेवणे अनिवार्य राहील.

·         प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांचे हॉल प्रवेशाचेवेळी सॅनिटाईज करावे. साबनाने हात स्‍वच्‍छ धुण्‍याची व्‍यवस्‍था करावी तसेच शक्‍यतो प्रत्‍येक उमेदवाराने हॉण्‍डग्‍लोजचा वापर करावा.

·         विद्यार्थ्‍यांचे तोंडाला मास्‍क लावणे अनिवार्य राहील. त्‍याचप्रमाणे प्रवेशापुर्वी प्रत्‍येक विदयार्थ्‍यांचे थर्मल स्क्रिनिंग करने अनिवार्य राहील.

·         दोन तुकडयामध्‍ये किमान अर्धा तास अवकाश ठेऊन प्रत्‍येक वेळी हॉल स्‍वच्‍छ व संगणक सॅनिटाईज करावेत.

·         कोव्हिड-19 साथरोग संबंधी सर्दी-खोकला,ताप, श्‍वसनसंस्‍थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या विदयार्थ्‍यांस प्रवेश देऊ नये.

·         शासन निर्धारित फी पेक्षा जास्‍त फीस विद्यार्थ्‍यांकडुन घेण्‍यात येऊ नये. तसे आढळल्‍यास अथवा तक्रार प्राप्‍त झाल्‍यास नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.

·         एकापेक्षा हॉलमध्‍ये किमान 5 उमेदवार व 1 अध्‍यापका शिवाय इतरांना प्रवेश निषिध्‍द करावा.

·         विद्यार्थी व त्‍यांच्‍या पालकांना दुरध्‍वनी क्रमांक घेऊन नेहमी संपर्क करावा तसेच जिल्‍हा प्रशासन तालुका प्रशासन व आरोग्‍य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्‍यात यावा. कोव्हिड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आरोग्‍य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्‍यात यावा. कोव्हिड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आरोग्‍य विभागाच्‍या दिलेल्‍या सुचना दर्शनी भागात लावाव्‍यात व त्‍या सुचनांचे पालन होईल यादृष्टिने कार्यवाही करावी.

·         प्रत्‍येक विषयासाठी केंद्रात स्‍वतंत्र बैठक व्‍यवस्‍था असावी.

·         विद्यार्थ्‍यांच्‍या कुटुंबात अथवा निवासस्‍थान परिसरात कोव्हिड-19 चा रुग्‍ण नसल्‍याची खात्री करावी.

·         प्रत्‍येक संस्‍थाचालकाने व सर्व विदयाथ्‍यासहीत सर्वांनी आरोग्‍य सेतु अॅप डाउुनलोड करणे बंधनकारक राहील.

·         प्रत्‍येक उमेदवारांचे आरोग्‍य कार्ड तयार करुन शारीरिक तापमान, सर्दी-खोकला यांच्‍या दैनंदिनी नोंदी घेण्‍यात याव्‍यात.

·         कोव्हिड-19 शी संबंधीत वेळावेळी निर्गमित होणारे शासन परिपत्रक, आदेश निर्णय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र आणि आदेशांचे पालन करण्‍यास कसुर केल्‍याचे निर्दशनास आल्‍यास संबंधित संस्‍थेस जवाबदार धरुन तात्‍काळ संस्‍था सील करण्‍यात येईल व त्‍याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्‍यात येईल. तसेच कोव्हिड-19 च्‍या अनुषंगाने निर्गमित केलेया सुचना व निर्देशांचे जे कोणी पालन करणार नाही अशा व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा-2005 आणि भारतीय दंड संहीता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कार्यवाही करण्‍यात येईल.

वरील या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सदहेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कार्यवाही अथवा खटला दाखल करता येणार नाही,  असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहेत.

00000

 

 


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...