Wednesday, February 21, 2018


छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे
अर्ज ऑफलाईन करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाइन विहित नमुन्यात अर्ज मुदतीत एक्सल सीट प्रपत्रा विद्यार्थ्यांची माहिती सीडीसह शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण व लेखाधिकारी (अनुदान) उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांच्याकडे मंजुरीसाठी महाविद्यालयांनी सादर करावीत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.   
राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी महाडीबीटी प्रणालीतून वगळून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. शासन परिपत्रकानुसार महाविद्यालयातील पात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून द्यावे. महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर सचना लावण्यात यावी. विद्यार्थ्यांकडून शासन परिपत्रकासोबत देण्यात आलेल्या ऑफलाईन अर्जाच्या नमुन्यात अर्ज घेमुदतीत एक्सल सीटच्या प्रपत्रामध्ये विद्यार्थ्यांची मुद्देनिहाय माहिती तयार करुन सीडीसह शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण व लेखाधिकारी (अनुदान) उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांचेकडे मंजुरीसाठी सादर करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे. 
याबाबत नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदान, विनाअनुदान, कायम विनाअनुदानत महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.  
0000000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...