सुधारित वृत्त
फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023
कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
· आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 12 :- फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नांदेड येथे तीन दिवसीय फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023 ला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तक्षशीला बुद्धविहार मैदान जंगमवाडी येथील प्रांगणावर या कार्यक्रमाचे 11 एप्रिल रोजी सायंकाळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिला शाहीर सीमा पाटील, नागसेन सवदेकर, डॉ. मधुकर मेश्राम यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
याचबरोबर आज 12 एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. गणेश चंदनशिवे, गौरव जाधव, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, कुणाल वराळे, शाहीर संतोष साळुंखे यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. गुरूवार दिनांक 13 एप्रिल रोजी मीरा उमप, अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी व सहकलाकारांचा तक्षशिला बुद्ध विहार मैदानावर बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमास नांदेडच्या रसिकांनी भरभरून दाद द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment