Wednesday, April 12, 2023

 समता पर्व अभियाना अंतर्गत

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच त्यांनी शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थीनीना व नागरीकांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

सकाळी 9 वा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीला सहाय्यक आयुक्त डॉ.तेजस माळवदकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. ही रॅली छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळाइंदिरा इंटरनॅशनल  पब्लिक  स्कुल विष्णुपरी, शांती निकेतन पब्लीक स्कुल मालेगांव, शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल पब्लिक स्कुल दत्तनगर, जिनिअस पब्लीक स्कुल आनंदनगर, गुरुकुल पब्लिक स्कुल वाडी बु. व पोदार इंटरनॅशनल स्कुल, नारायणा इंटरनॅशनल स्कूल, केंब्रिज स्कुल शिवाजीनगर इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यानी रॅलीत सहभाग घेतला. शासकीय वसतिगृहातील मुले-मुली, कर्मचारी यांनी रॅलीत सहभाग नोंदविला.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. समता पर्वानिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी समाज कार्यालयाच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या. सामाजिक समता पर्वा निमित्त समाज कल्याण कार्यालय अधिनस्त अनु.जाती मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा एकूण 4 व मुला-मुलींचे 16 शासकीय वसतिगृहात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारीत वाचन प्रेरणा उपक्रम राबविण्यात आला. यात शासकीय निवासी शाळेतील व शासकीय वसतीगृहातील जवळपास 1500 ते 1700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी केले .

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...