Saturday, August 1, 2020


मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी
163 बचतगटांचे अर्ज पात्र
नांदेड (जिमाका) दि. 1 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांसाठी सन 2018-19 या वर्षात मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी 365 बचतगटांनी अर्ज केली होती. त्यातील 163 बचतगटांचे अर्ज तपासणीअंती पात्र ठरली आहेत. या पात्र बचतगटांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधित बचतगटांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करण्याची योजना आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
अपात्र बचतगटांना अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी चारवेळा संधी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जे अपात्र किंवा ज्या बचतगटांनी मुळ कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयाकडून तपासून घेतली नाहीत त्यांना 9, 10 व 11 जुन 2020 या तीन दिवसाची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत अध्यक्ष, सचिव व बचत गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बचतगटाचे नोंदणी प्रमाणपत्र, चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना, बचतगटाचा शिक्का आणि अध्यक्ष सचिव यांचे बँकेला आधार लिंकचे प्रमाणपत्र या पुराव्यासह बचतगटाचे अध्यक्ष व सचिवांना मुदतीत मुळ कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली होती, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
                                                                     00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...