Tuesday, September 19, 2017

शेतकऱ्यांना कपाशीवरील शेंदरी बोंडअळी
 नियंत्रणाच्या मार्गदर्शनासाठी तालुकास्तरावर मेळावे  
नांदेड दि. 19 :- कपाशीवर शेंदरी बोंड अळीमुळे होणारे नुकसान कमी करण्याच्या हेतुने प्रकल्प संचालक (आत्मा) कृषि विभाग नांदेड Monsanto कंपनीच्या सहकार्याने जिल्हामध्ये व्यापक प्रमाणात शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मोहिम स्वरुपात कार्यक्रम घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. यासाठी तालुकानिहाय शेतकरी मेळाव्यात जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहान नांदेडचे प्रकल्प संचालक (आत्मा) एम. टी. गोडेंस्वार यांनी केले आहे.
मागील दोन वर्षापासून शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कपाशीचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे प्रमुख कारण हे बीटी कपाशीच्या वाणाची लागवड करताना रेफ्युजी पीकाची लागवड करणे हे होय. कापुस बीटी बियाण्यासोबत 120 ग्रॅमचे नॉन बीटी वाणाचे बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. याची लागवड बीटी वाणांच्या चारही बाजुनी करणे आवश्यक असते.  
यासाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय शेतकरी मेळावे घेण्याचे नियोजन आहे. नायगाव (23, 25,27,29 सप्टेंबर व 2 ऑक्टोंबर 2017), धर्माबाद (24, 26, 28, 29 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर), बिलोली (23, 25,27,29 सप्टेंबर व 2 ऑक्टोंबर), देगलूर (24, 26, 28, 29 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर), मुखेड ( 24, 26, 28, 29 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर), नांदेड (3, 5, 7, 9, 11 ऑक्टोंबर) , मुदखेड ( 2, 4, 6, 8, 10 ऑक्टोंबर) , अर्धापूर ( 3, 5, 7, 9, 10 ऑक्टोंबर) , कंधार ( 4, 6, 8, 11, 13 ऑक्टोंबर) , लोहा ( 3, 5, 7, 9, 11 ऑक्टोंबर) , किनवट (11, 13, 15, 17, 18 ऑक्टोंबर) ,  हदगाव (7, 9, 11, 13, 15 ऑक्टोंबर) , माहूर (11, 13, 15, 17, 18 ऑक्टोंबर), हिमायतनगर (7, 9, 11, 13, 15 ऑक्टोंबर),  भोकर (11, 13, 15, 17 व 18 ऑक्टोंबर) , उमरी (9, 11, 13, 15, 16 ऑक्टोंबर 2017) तालुकानिहाय दिनांकानुसार शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...