वृत्त क्र. 847
सन 2023 च्या खरीपातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य
नांदेड दि. 18 सप्टेंबर : राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये तर 0.20 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचे (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे. चूक होऊ नये यासाठी या संमतीपत्रावरोवर आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहाय्यकांना द्यावी. याशिवाय ज्या क्षेत्रावर सामायिक खातेदार आहेत त्यांनी सामायिक खातेदार नाहरकत पत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे.
सदरचे संमतीपत्र तसेच सामायिक खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र यांचा नमुनापत्र आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकांकडून शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. आजच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील प्राप्त याद्यानुसार ७ लाख ४२ हजार ८९२ पैकी ४ लाख ९९ हजार ९३१ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आली आहे . तरी अद्याप ज्या शेतकऱ्याणी संमतीपत्र , नाहरकत प्रमाणपत्र संबधित कृषि सहाय्यकाकडे सादर केले नाही त्यांनी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावे. लवकरच अर्थसहाय्य वितरीत करावयाचे अपेक्षित आहे असे कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment