Wednesday, September 18, 2024



विशेष वृत्त 

वात्सल्य योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभात नांदेड जिल्हयातील 50 बालकांचा सहभाग

10 बालकांना 'प्राण'चे वाटप ; 55 खाते शुभारंभाला उघडण्यात आले

 1 ते 18 वयोगटासाठी आजपासून बँक व पोस्टात उघडा वात्सल्य पेन्शन योजनेचे खाते

नांदेड दि. 18 सप्टेंबर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या वात्सल्य नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात आज 18 सप्टेंबरला झाली. नवी दिल्ली येथून झालेल्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील 50 बालकांनी सहभाग घेतला त्यापैकी दहा बालकांना कायम निवृत्ती वेतन कार्ड देण्यात आले

नांदेड  जिल्ह्याचा 50 बालकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संबोधन ऐकायला मिळाले.हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात ऑनलाईन घेण्यास आला.

नांदेड जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक कालिदासू पक्काला, सहमहाव्यवस्थापक यु. सुरेश बाबू, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा, केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक राम शृंगारे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक सत्येंद्र कुमार, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिलीप दमय्यावार,जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आणि या कार्यक्रमाचे आयोजक अनिल गचके यांची उपस्थिती होती.

जन्मदाखला व आधार आवश्यकता

यावेळी उपस्थित पालक व मान्यवरांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले आपल्या प्रास्ताविकामध्ये कालिदासू यांनी एनपीएस संदर्भात माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी हे निवृत्ती बचत खाते अत्यंत उपयोगी असून मुलांच्या नावे बचतीसाठी पालकांनी खाते उघडण्यासाठी प्राधान्य द्यावे. मुलांना बचतीची सवय सोबतच निवृत्ती काळात त्यांच्याकडे आवश्यक रक्कम उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. यासाठी फक्त मुलाचे जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड आवश्यक आहे . शक्यतो ज्या ठिकाणी पालकाचे अकाउंट असेल अशा बँकांमध्ये हे अकाउंट काढल्यास उपयोगी ठरू शकते शासनाच्या नियमानुसार बँक व पोस्टामध्ये हे खाते उघडले जाऊ शकते जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले.

55 खाते उघडले

यावेळी दहा बालकांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN- Card ) अर्थात प्राण कार्ड देण्यात आले. नांदेडमध्ये पहिल्याच दिवशी 55 खाते उघडण्यात आले आहेत यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ने 25 खाते बँक ऑफ इंडिया ने बारा खाते युनियन बँकेने दहा खाते तर बँक ऑफ महाराष्ट्र ने पाच खाते उघडले आहे नागरिकांनी उद्यापासून याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी गचके यांनी केले आहे.

काय आहे वात्सल्य योजना

वात्सल्य ही शून्य ते 18 वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान 1 हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करू शकतो. मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे. मुलगा 18 वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते 18 या वयोगटात उघडण्याची ही योजना आहे. मुलांसाठी दीर्घकालनी बचत आणि आर्थिक नियोजनाला यामुळे हातभार लागणार आहे. भारतीय नागरीक असणे ही या योजनेची प्राथमिक अट असून नागरिकांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यातून आर्थिक सुरक्षा निर्माण केली जाते.     

0000




 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...