Saturday, March 27, 2021

                                     379 ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांमार्फत जिल्हाभरात

नांदेड लसीकरणासाठी विशेष मोहिम

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 6 हजार 500 व्यक्तींना लसीकरण   

नांदेड (जिमाका) दि. 27 :- नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बीपी, शुगर व इतर गंभीर आजारांच्या व्यक्तींसाठी आज जिल्ह्यातील 379 ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांवर कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. ग्रामीण भागात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून अशा व्यक्तींची सुरक्षा व्हावी यासाठी ही विशेष मोहिम आपल्या नांदेड जिल्ह्यात सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात 379 आरोग्य उपकेंद्र असून यात 49 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या 49 प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वीपासूनच लसीकरण सुरु केले असून आता नव्याने 330 उपकेंद्रांची लसीकरणासाठी भर पडली आहे. सर्वच तालुक्यातील आज निवड उपकेंद्रापासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत 6 हजार 500 पेक्षा अधिक व्यक्तींनी आज लस घेतली. उद्यापासून टप्प्याटप्याने सर्व केंद्र पूर्ण कार्यक्षमतेने सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. याच केंद्रांवर 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनाही लसीकरणाच्या टप्प्यात घेतले जाणार आहे. ग्रामीण आरोग्य विभागातर्फे एवढ्या व्यापक प्रमाणात नांदेड जिल्ह्यात ही मोहिम प्राथमिक स्तरावर सुरु करण्यात आली आहे. यासाठी लागणारे वैद्यकिय पथक ग्रामीण आरोग्य विभागाने तयार ठेवले असून जिल्हा प्रशासनामार्फत त्याचे संयोजन केले जात आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...