जास्तदराने
सिलेंडरची विक्री केल्यास तक्रार नोंदवा
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन
▪ सिलेंडरसाठी किरकोळ विक्री किंमतीप्रमाणेच
नांदेड (जिमाका) दि. 21 :- ग्रामीण व शहरी भागातील थेट घरपोच सिलेंडरसाठी आता किरकोळ विक्री किंमती प्रमाणेच दर द्यावेत असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. गॅसच्या निर्धारित किंमतीमध्ये सर्व रक्कम आकारलेली असल्याने ग्राहकांनी कोणताही अतिरक्त शुल्क देऊ नये असे त्यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. कोणत्याही गॅस वितरकांनी ठरवुन दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने गॅस सिलेंडरची विक्री केल्यास त्यांची तक्रार संबंधित तहसिल कार्यालय पुरवठा विभागात तसेच जिल्हा पुरवठा कार्यालय नांदेड येथे लेखी तक्रार करावी, असे आदेशात नमूद केले आहे.
नांदेड जिल्हयात कार्यरत भारत पेट्रोल कॉर्पेरिशन, हिंदुस्तान पेट्रोल कॉर्पेरिशन, इंडियन पेट्रोल कॉर्पेरिशन या कंपन्याच्या वितरकाव्दारे गॅस वितरण चालु आहे. ऑइल अॅंड नॅचरल गॅस तर्फे सर्व कंपन्यांना खालील प्रमाणे दर देण्यात आले आहे.(माहे डिसेंबर 2020 साठी)
|
Rate
for 14.2 kg cyllndor |
Rate
for 5.0 kg cyllndor |
||||
Compamy name |
[Home dallvery] RSP Retall sale price per 14.2 kg
cyllnder[ in Rs] |
Godown Dellvery Rate [RSP dallvery charges ] |
dallvery charges per 14.2 kg cyllnder[ in Rs] |
[Home dallvery] RSP Retall sale price per 5.0 kg cyllnder[
in Rs] |
Godown Dellvery Rate [RSP dallvery charges ] |
dallvery charges per 5.0 kg cyllnder[ in Rs] |
BPCL IOCL, HPCL |
670 |
641 |
29 |
250 |
235.5 |
14.5 |
घरगुती वापराच्या 14.2 किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीला 65 रुपये एवढे कमिशन मंजुर केलेले आहे. त्यात त्या संबंधित गॅस एजन्सीसाठी 36 रुपये आस्थापना खर्चासाठी व 29 रुपये एवढी रक्कम त्यांना वाहतुकीसाठी मंजुर केलेली आहे. तसेच 5.0 किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीला 32.05 रुपये एवढे कमिशन मंजुर केलेले आहे. त्यात त्या संबंधित गॅस एजन्सीसाठी 18 रुपये आस्थापना खर्चासाठी व 14.05 रुपये एवढी रक्कम त्यांना वाहतुकीसाठी मंजुर केली आहे. तसेच अतिरिक्त वाहतुक दर हे काढुन टाकण्यास सुचीत करण्यात आले आहे.
जर गोडावुन मधुन गॅस सिलेंडर घेतले किंवा खरेदी केला जात असेल तर गॅस एजन्सीने 14.2 किलोच्या गॅस सिंलेडरसाठी 29 रु आणि 5 किलोसाठी 14 रुपये 50 पैसे असे डिलेव्हरी चार्जेस आकारु नये. संबंधित गॅस वितरकांच्या कार्यक्षेत्राबाहेरील ग्राहक असल्यास त्यांनी ते स्वत:हुन त्यांच्या सिमा क्षेत्राबाहेरील दुसऱ्या नजीकच्या गॅस वितरकांच्या ग्राहकांना जोडावे जेणेकरुन ग्राहकांना वाहतुकीच्या खर्चाचा भुर्दड पडणार नाही. जिल्हयातील सर्व गॅस ग्राहकांना किरकोळ विक्री किंमत (RSP) दरा व्यतीरीक्त कोणताच अतिरिक्त चार्ज लावु नये. तसेच संबंधित गॅस वितरकांनी गॅस सिलेंडरची विक्री (RSP) दरातच विक्री करणे बंधनकारक आहे.
जर जिल्हयातील ग्रामीण भागातील कोणत्याही गॅस वितरकांनी
पेट्रोलियम मंत्रलयाकडुन वेळोवेळी घोषित होणाऱ्या सेल रिटेल प्राइस प्रमाणे गॅस सिलेंडरची विक्री करणे बंधनकारक आहे. कोणत्याही
गॅस वितरकांनी त्यांना ठरवुन दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने गॅस सिलेंडरची
विक्री केल्याची तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालयातील पुरवठा
विभाग तसेच जिल्हा पुरवठा कार्यालय नांदेड येथे लेखी तक्रार करावी. या तक्रारीमध्ये
चौकशी अंती तथ्य आढळल्यास व ते निष्पन्न झाल्यास त्याच्याविरुध्द जीवनावश्यक
वस्तु कायदयातील तरतुदींच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी
स्पष्ट केले आहे.
00000
No comments:
Post a Comment