Wednesday, September 1, 2021

 1 जानेवारी 2022 अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर 

नांदेड (जिमाका), दि. 1 :- भारत निवडणूक आयोगाने राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघात छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेली नाहीत किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यात अर्ज करता येतील. मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाचे उपक्रम व कालावधी पुढीलप्रमाणे राहील. 

दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दुर करणे इ. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे द्वारा घरोघरी भेट देवून तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे विभाग/भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणिकीकरण करणे यासाठीचा कालावधी सोमवार 9 ऑगस्ट 2021 ते रविवार 31 ऑक्टोंबर 2021 पर्यत असेल. एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे सोमवार 1 नोव्हेंबर 2021 रोजीचा कालावधी राहील. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार 1 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार 30 नोव्हेंबर या दरम्यानच्या असेल. विशेष मोहिमेचे दिनांक दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चीत केलेले दिवस. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी सोमवार 20 डिसेंबर 2021 पर्यत दरम्यान राहील. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यासाठी बुधवार 5 जानेवारी 2022 पर्यत असेल. 

1 जानेवारी 2022 रोजी ज्या भारतीय नागरिकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2004 वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील. 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रारुप मतदार याद्या सर्व मतदान केंद्रावर, मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्द करण्यात येतील. या मतदार यादीमध्ये ज्या मतदाराची नावे नाहीत अशा मतदारांना नमुना-6 मध्ये अर्ज सादर करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील. तसेच मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नोंदीबाबत आक्षेप असल्यास या नोंद वगळण्यासाठी नमूना-7 मध्ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्या नोंदीबाबत दुरुस्ती करावयाची असल्यास नमूना-8 मध्ये आणि एका भागातून दुसऱ्या यादीभागात नोंद स्थंलातरीत करावयाची असल्यास विहित नमूना-8 अ मध्ये अज्र सादर करता येतील. 

1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाही अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांच्याकडेही स्विकारण्यात येतील. 

मतदाराच्या सुलभतेसाठी  www.nvsp.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी  www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळास भेट द्यावी. 

जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी , दुरुस्ती, वगळणी करुन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nvsp.in संकेतस्थळाचा वापर करावा. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) यांचेकडे आपला नाव नोंदणीचा अर्ज भरून द्यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...