प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश
नांदेड (जिमाका) दि 1 :-जिल्हा प्रशासनाच्या सर्तकतेमुळे हळगाव येथील बालविवाहाला आळा घालण्यास यश आले आहे.याप्रसंगी संबंधीत दोषींविरुध्द कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहे.
हदगाव शहरामध्ये एका अल्ववयीन बालिकेच्या बाल विवाह होत असल्याची माहिती तहसील कार्यालय, पोलिस विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तात्काळ बाल विवाह थांबविला. याप्रकरणातील अल्पवयीन मुलीचे वय 12 वर्ष 9 महिने असल्याचे शालेय निर्गम उत्ताऱ्यावरुन आढळून आले.मुली बाबात कोणतीही माहिती तात्काळ प्राप्त होवू शकली नाही. तसेच नवरदेवास सिनेस्टाईल पध्दतीने शोधून त्याला पोलिस विभागाने ताब्यात घेतले.
जिल्हाधिकारी यांना माहिती मिळताच त्यांनी संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले. तसेच अल्पवयीन मुलीचे आईवडील व नवरदेव मुलाकडील मंडळी यांच्या रितसर जबाब नोंदवून घेऊन बाल विवाह घडवून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना दिल्या. मुलीची काळजी व सरंक्षण व बालिकेच्या भविष्यातील पुर्नवसाच्या दृष्टीने मुलीला बालकल्याण समिती नांदेड यांच्या समक्ष हजर करणे बाबत कळविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी मोहिम हाती घेतली.तसेच बाल विवाह रोखण्यासाठी जबाबदार घटकाचे आदेश निर्गमित करण्यात आले.तरीही छुप्या पध्दतीने बाल विवाह घडुन येत आहेत.असे बालविवाह होणार नाहीत यासाठी संबंधित यंत्रनेने सैदव तत्पर राहण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
बालविवाह रोखण्यासाठी तहसीलदार जिवराज डापकर, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, जिल्हा बालविकास अधिकारी डॉ.रशिद शेख, पोलिस निरिक्षक हणमंत गायकवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता कदम, पोलिस उपनिरिक्षक गोविंद खेरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, संरक्षण अधिकारी सोनारकर तसेच स्थानिक पोलिस
विभाग स्थानीक प्रशासन यांनी सहकार्य केले.
00000
No comments:
Post a Comment