Tuesday, November 1, 2022

 शासकीय तंत्रनिकेतन येथे वाचन कट्टा उपक्रमाची सुरुवात 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-  शासकीय तंत्रनिकेतन येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. या दिवशी संस्थेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. केवळ एक दिवस वाचन करून भागणार नाही. विद्यार्थी, अधिकारीकर्मचारी यांना कायमस्वरूपी वाचनाची आवड लागावी. या उद्देशाने संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या मार्गदर्शनाने "वाचन कट्टा" हा वाचकमंच शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्यात आला आहे.

चला वाचूया स्वतःला घडू असे या वाचन कट्टा उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या अंतर्गत दर महिन्यातील चौथ्या शुक्रवारी 'मी वाचलेले साहित्यया विषायास अनुसरून एखादा उताराकविता, ललित, जीवनचरित्राचा भाग इत्यादी उपस्थितांसमोर वाचून आपला वाचनानंद इतरांपर्यंत पोहोचवावा हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमात पहिल्या कार्यक्रमात दिवाळीच्या सुट्ट्या असतानाही विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. डी.जी कोल्हटकर यांनी प्रसिद्ध निसर्ग कवी ना.धों महानोर यांचा जीवनपट सांगतानाच त्यांच्या दोन कविता यावेळी सादर केल्या.

पायल जाधवदेशपांडे संस्कृती या विद्यार्थिनींनी आपली साहित्यकृती यावेळी सादर केली. ए. एन. यादव यांनी वार्ध्यक्य काळात कुढत जगण्यापेक्षा हसत जगण्या संदर्भातली एक अनामिक कवीच्या कवितेला उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. अनघा जोशी यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. आर एम सकळकळेविभाग प्रमुख यंत्र विभाग यांनी सर्व सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांचे कौतुक व अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य पी. डी. पोफळे यांनी वाचन कट्ट्याच्या या उपक्रमास शुभेच्छा देताना कुठल्याही औपचारिकते शिवाय हा कार्यक्रम व्हावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या. ए एन यादव यांनी आभार प्रदर्शन केले.

0000

No comments:

Post a Comment

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ   आज देवस्वारी व पालखी पूजन  नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी...