शासकीय तंत्रनिकेतनच्या
विद्युत विभागात एफडी ड्राईव्हचे उद्घाटन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्युत विभागात जेफरान इंडिया प्राइवेट लिमिटेड पुणे यांच्यावतीने सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा थ्री फेज व्हिएफडी ड्राईव्ह हा विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे उपकरण अद्यावत असून याचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी उद्योगात वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी होणार आहे. या ड्राईव्हचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या हस्ते प्रत्यक्ष तर जेफरान इंडिया प्राइवेट लिमिटेडचे डायरेक्टर मिलन शहा यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही.
सर्वज्ञ, प्रा.पी. डी. पोपळे, प्रा.
लोकमनवार, प्रा. एस. पी. कुलकर्णी, मार्गदर्शक
प्रा. पी. के. विनकरे, प्रा. पी. एस. लिंगे, प्रा. अब्दुल हादी, प्रा. ओम चव्हाण, प्रा. वाय. एस. कटके,
प्रा.जी. एम. बरबडे, ए. एस. सायर, प्रा. पी. बी. खेडकर, प्रबंधक श्री.
दुलेवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री. जमदाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील श्री मिराशे, ढाळे,
मध्यबैनवाड व झडते यांनी परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment