Wednesday, November 29, 2017

मौखिक आरोग्य तपासणीचा
गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा
- प्र. जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड , दि. 29 :- जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहिम 1 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत राबविण्यात येत आहे. मोहिमेत 30 वर्षे वयोगटावरील गरीब, गरजू रुग्णांनी मौखिक आरोग्य तपासणी करुन मौखिक आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्ह्यातील मौखिक आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन विविध विभाग, आरोग्य संघटना, शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे, अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेबद्दल माहिती दिली. तसेच जिल्हा रुग्णालायांतर्गत सुरु असलेल्या मौखिक आरोग्य सेवेबद्दल डॉ. किरण घोडजकर यांनी माहिती दिली.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त यु. आर. जाधव, शिक्षणाधिकारी शिवाजी खडे, आय.एम.ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, आय.डी.ए.चे. प्रतिनिधी डॉ. संदीप दंडे, मनपा वै. आ. अ . प्रतिनिधी डॉ. अशरफ खुरेशी, जिल्हा रुग्णालय येथील मौखिक कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रमधिकारी डॉ. अर्चना तिवारी, ईएनटी तज्ज्ञ डॉ. रहेमान हे उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...