Friday, June 28, 2024

विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन

  वृत्त क्र. 542

विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत

मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन   

 

नांदेडदि. 28 :- राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त सन 2024-25 या वर्षात प्रवेशित इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र मुदतीत मिळाण्यासाठी  तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयस्तरावर 1 व 2 जुलै रोजी मार्गदर्शन व ऑनलाईन अर्ज स्विकृतीसाठी विशेष मोहिम शिबिराचे आयोजन केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी या विशेष मोहिम शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांनी केले आहे.

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी सर्व महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या समान संधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधी (नोडल अधिकारी) यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रामार्फत सन 2024-2025 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले एकत्रित अर्ज स्विकृतीसाठी 2 जुलै 2024 पर्यत महाविद्यालयामध्ये एक दिवशीय शिबिर आयोजित करुन विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

  

सोमवार 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11.30 ते 3.30 वाजेपर्यत आयोजित शिबिर याप्रमाणे आहेत. धर्माबाद व बिलोली तालुक्यासाठी लाल बहादूरशास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे नोडल अधिकारी म्हणून वरिष्ठ लिपिक सिद्राम रणभिरकर व मनोज वाघमारे यांची नेमणूक केली आहे. भोकर, हिमायतनगर, किनवट तालुक्यासाठी हुतात्मा जयवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, हिमायतनगर येथे कनिष्ठ लिपिक विठ्ठल बी. आडे व प्रकल्प सहाय्यक ओमशिवा चिंचोलकर यांची तर  देगलूर व नायगांव तालुक्यासाठी देगलूर महाविद्यालय, देगलूर येथे पोलीस  कॉन्स्टेबल बालाजी शिलगिरे व प्रकल्प सहाय्यक राजेश मेथेवाड यांची नेमणूक केली आहे. लोहा व कंधार तालुक्यासाठी श्री. संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा येथे  संशोधन सहाय्यक वैजनाथ मुंडे यांची नेमणूक केली आहे.

 

मंगळवार 2 जुलै 2024 रोजी सकाळी 11.30 ते 3.30 आयोजित शिबिर पुढीलप्रमाणे आहेत. हदगांव व माहूर तालुक्यासाठी पंचशिल महाविद्यालय, हदगांव येथे व्यवस्थापक शिवाजी देशमुख व कार्या. सहाय्यक संजय अरगडे यांची नेमणूक केली आहे. मुखेड तालुक्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, मुखेड येथे अभि. पाल बाबू कांबळे व प्र. सहायक राजेश मेथेवाड यांची नेमणूक केली आहे. नांदेड, अर्धापूर तालुक्यासाठी  यशवंत महाविद्यालय नांदेड येथे विधी अधिकारी साजीद हासमी व प्रकल्प सहायक माधव बेलके यांची नेमणूक केली आहे. उमरी व मुदखेड तालुक्यासाठी कै. बाबासाहेब देशमुख बोरटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमरी येथे  अभि. पाल बाबू काबंळे व प्रकल्प सहायक ओमशिवा चिंचोलकर यांची नेमणूक केली आहे.

 

सन 2024-25 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्यानी, समान संधी केंद्र नियुक्त प्रमुख प्रतिनिधी व नोडल अधिकारी यांनी तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय स्तरावर आयोजित केलेल्या शिबिराच्या ठिकाणी माहितीसह उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...