Tuesday, August 21, 2018


डिजी लॉकरमधील वाहनाचा परवाना,
नोंदणी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार  
            नांदेड, दि. 21 :- नागरिकांकडे डीजी लॉकर मधील डिजीटल साक्षांकीत केलेले वाहन चालक अनुज्ञप्ती आणि नोंदणी प्रमाणपत्राची प्रत रस्त्यावर वाहतूक करतांना संबंधीत अधिकाऱ्यांना दाखविल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार असून त्यावर कारवाई करण्यात येणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
केंद्र शासनातर्फे डिजी लॉकर प्रणाली विकसीत करण्यात आली असून याप्रणालीमध्ये केंद्र, राज्य शासनातर्फे नागरिकांना जारी करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची डिजीटल कॉपी डिजी लॉकरमध्ये उपलब्ध राहतात.  यासाठी अर्जदाराने आधार क्रमांक डिजी लॉकर बरोबर संलग्न करुन डिजी लॉकरमध्ये आपले कुठलेही कागदपत्रे जतन ठेवू शकतो. मोटार वाहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर डिजी लॉकरव्दारे अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र जतन करण्याबाबत माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.  
नागरिकांकडे डीजी लॉकर मधील डिजीटल साक्षांकीत केलेले वाहन चालक अनुज्ञप्ती आणि नोंदणी प्रमाणपत्राची प्रत उपलब्ध असेल रस्त्यावर वाहतूक करतांना वाहन चालकास अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी  कागदपत्रासाठी थांबविले असता त्यांनी जर मूळ वाहन चालक अनुज्ञप्ती / वाहन नोंदणी प्रमाणपत्राऐवजी डिजीटल स्वरुपातील वाहन चालक अनुज्ञप्ती / वाहन नोंदणी प्रमाणपत्र दाखविल्यास ते ग्राहय धरण्यात येईल. त्यावर कारवाई करण्यात येणार नाही. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...