Tuesday, December 21, 2021

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु

 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत

तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 21:- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2021-22 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात  नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, लोहा, किनवट, बिलोली (कासराळी) देगलूर, जाहूर (ता. मुखेड), गणेशपूर (ता.किनवट) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत तूर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झाली आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील तूर पिकाचा ऑनलाईन पिक पेरा नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड व बॅक पासबूक आदी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी, असे आवाहन  नांदेड जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...