Friday, November 4, 2016

हातमाग कापडाच्या खरेदीसाठी
स्पेशल हॅण्डलूम एक्सपो-2016ची पर्वणी
प्रदर्शन 10 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले
नांदेड, दि. 4 :- केंद्र शासनाच्या सीएचडीएस योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्यावतीने राज्य हातमाग महामंडळ नागपूर यांनी नांदेड येथे स्पेशल हॅण्डलूम एक्सपो-2016 चे आयोजन केले आहे. विमानतळ रोड सौभद्र मंगल कार्यालय येथे आयोजित हे भव्य प्रदर्शन 10 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात हातमागावरील पारंपारिक कापड खरेदीची पर्वणी उपलब्ध झाली आहे. यामध्ये खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंत सूटही देण्यात येत असल्याची माहिती हातमाग महामंडळाच्या प्रदर्शन आयोजकांनी दिली आहे.
पारंपारिक हातमागावरील पण आधुनिक शैलीला साजेसे कापड या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. यामध्ये टसर, सिल्क, कॅाटन, सहावार प्रिंटेड साड्या, ड्रेसमटेरीलय, बेडशीट, चादर, टॅावेल, नॅपकीन्स, जॅकेटसं, इंडिया हॅण्डलूम उत्पादने, दरी, सतरंजी, पोछा यांच्यासह तयार शर्टस, शर्टींग-सुटींग यांच्यासाठीचे कापड आदी वैविध्यपुर्ण प्रकार उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी तसेच हातमाग कारागिरांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हातमागावरील विविध वस्त्रप्रावरणांच्या खरेदीचे आवाहन केले आहे. त्यानुसार या प्रदर्शनात पुर्ण सूती कापड आणि त्याचे प्रकार कुटुंबातील प्रत्येकासाठी उपलब्ध असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. हे प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील खादी, सूती कापड प्रेमी तसेच हातमाग कारागिरांना-उद्योगाला प्रोत्साहन देऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यासाठी नागरिकांनी कुटुंबासह भेट द्यावी, असे आवाहन विपणन अधिकारी तथा या प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...