वृत्त क्रमांक 469
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून
विकास कार्य गतिमान करू : खा. डॉ. अजित गोपछडे
नांदेड दि. 4 मे :- राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांचा विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आगामी काळात विकास कामे पूर्ण होतील असा विश्वास खासदार अजित गोपछडे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या नांदेड जिल्हा प्रशासन विकासकार्य आढावा बैठकीत खा. डॉ. गोपछडे बोलत होते. लोकांच्या अनेक प्रश्नांची माहिती घेऊन प्रशासनास अवगत केले. कडक उन्हाळ्यामुळे नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची सूचना केली.
ग्रामीण भागात सध्या खरीप हंगामाची पूर्व तयारी चालू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी बांधवांना योग्य वेळी मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील मालगुजारी तलावातला गाळ तात्काळ काढावा यासाठी मनरेगा आणि लोकसहभागातून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत.तसेच शहरी भागात नालेसफाई चे काम वेळेत पूर्ण करावेत. पावसाळ्यात वृक्षारोपण योजनेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी करावे. मातृवंदन योजना, आयुष्मान आरोग्य मंदिर, अंगणवाडी, आशा सेविकांचे प्रश्न सोडविणे, कुपोषण मुक्ती बाळासोबत आईची पण झाली पाहिजे, बालिका शिक्षण बसव्यवस्था दुरुस्त करावी, बालिका पंचायत व्यवस्थेस प्रोत्साहन देणे,पूण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी निमित्त महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण उन्नती, प्रधानमंत्री सूर्य घर योजना, गोदावरी शुद्धिकरण, नांदेड शहरातील रहदारी समस्या उपाययोजना, आगामी 20 वर्षासाठी होलीसिटी सर्वांगीण विकास आराखडा, जिल्हा परिषद नवीन इमारत मिनी सचिवालय बांधकाम प्रस्ताव तयार करणे, जीर्ण झालेल्या पोलीस वसाहतींचे बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करणे, तरोडेकर चौक ते मुथा चौक फ्लायओवर तयार करणे, कैन्सर, मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण, कायदा सुव्यवस्था याबाबतीत अनेक उपयुक्त दिशानिर्देश जिल्हाप्रशानास दिले.
खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी 100 दिवसीय प्रशासकीय मूल्यमापनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे यांचे शाल देऊन विशेष अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय मुल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व विभागांचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे देखील विशेष अभिनंदन केले.
000
No comments:
Post a Comment