Tuesday, April 3, 2018


मतदान, मतमोजणी
केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड दि. 3 :- जिल्ह्यातील पंचायत समिती बिलोली 66- सगरोळी निर्वाचक गण व पंचायत समिती लोहा 83- मारतळा निर्वाचक गणाच्या निवडणुकीची संपर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने मतदानाच्या दिवशी शुक्रवार 6 एप्रिल रोजी मतदान केंद्र परिसरात व मतमोजणीच्या दिवशी शनिवार 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.  
 या निर्वाचक गणाच्या मतदान व मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. या मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत 6 एप्रिल रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 7 एप्रिल रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...