Thursday, January 21, 2021

 

भोकर तालुक्यातील 194 कोटीच्या विविध विकास कामांचे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- भोकर शहरातील व तालुक्यातील 194 कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जानेवारी 2021 रोजी करण्यात येणार आहे. 

भोकर तालुक्यातील विविध विकास कामे लवकर पूर्णत्वास यावे याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता भोकर येथील मोंढा मैदानावर जाहीर कार्यक्रमाद्वारे होईल. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जि.प. कृषी पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरिहरराव भोसीकर, दत्ताभाऊ कोकाटे, जि. प. गटनेता प्रकाश भोसीकर, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, पं.स. सभापती निता रावलोड, कृउबा संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विविध विकास कामांचे भूमिपूजन

हादगाव ,तामसा, भोकर, उमरी, कारेगाव, लोहगाव, रस्त्याचे पेवर शोल्ड सह दुपदरीकरण करणे, भोकर मधील विश्रामग्रहाचे बांधकाम, मुदखेड भोकर रस्ता 161 (अ) सुधारणा करणे, भोकर शहरासाठी वळण मार्गाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, भोकर येथे 1800 मे. टन क्षमतेच्या नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकाम, भोकर नगर परिषद विविध विकास योजने अंतर्गत विकास कामे, अशा विविध विकासकामांचा शुभारंभ सायंकाळी 4 वा. मोंढा मैदान भोकर येथे जाहीर स्वरूपात ठेवला आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...