Friday, May 20, 2022

 मानव विकास कार्यक्रमांतर्गत गांडुळ कल्चर युनिट,

कृषि औजारे बँक, हळद पिकासाठी औजारे बँक

व सोयाबीन टोकन यंत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- मानव विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत निवडलेल्या तालुक्यात प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, लोहा, देगलूर, धर्माबाद, बिलोली, किनवट, हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी असे 9 तालुक्यात योजनेअंतर्गत लाभ दिल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या तालुक्यातील नोंदणीकृत गटांनी मंगळवार 31 मे 2022 पर्यंत तालुका कृषि कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावे. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

कृषि विभागामार्फत मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत गांडुळ कल्चर युनिट उभारणे याबाबीचे 199 आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटांचे लक्षांक प्राप्त आहे. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या गटांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. (प्रकल्‍प खर्च 1 लाख रुपये व अनुदान 75 टक्के जास्तीत जास्त  75 हजार रुपये राहील).

कृषि औजारे बँक उभारणे या बाबीसाठी मुदखेड व धर्माबाद या तालुक्यात 3 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनींना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदखेड व धर्माबाद तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी यांनी दिनांक 31 मे 2022 पर्यंत तालुका कृषि कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावे. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहून लाभार्थी निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनींना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. (प्रकल्‍प खर्च 19.39 लाख रुपये व अनुदान 75 टक्के जास्तीत जास्त रू. 14.54 लाख राहील). 

हळद पिकासाठी औजारे बँक उभारणे या बाबीसाठी लोहा, बिलोली, उमरी, हिमायतनगर, धर्माबाद, मुदखेड व भोकर या तालुक्यामध्ये प्रत्येकी 01 याप्रमाणे लक्षांक प्राप्त आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी यांनी तालुका कृषि कार्यालयामध्ये दिनांक 31 मे 2022 पर्यंत अर्ज करावे. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहून लाभार्थी निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनींना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. (प्रकल्‍प खर्च   रू. 20.02 लाख व अनुदान 75 टक्के जास्तित जास्त रू. 15.02 लाख राहील).

सोयाबीन टोकन यंत्र पुरवठा करणे या बाबीसाठी मुदखेड तालुक्यातील 25 आत्मा अंतर्गत महिला शेतकरी बचत गटांना लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत महिला शेतकरी गटांनी तालुका कृषि कार्यालयामध्ये दिनांक 31 मे 2022 पर्यंत अर्ज करावे. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहून लाभार्थी निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सोयाबीन टोकन यंत्राचे टेस्ट रिपोर्ट घेणे बंधनकारक आहे. अशा महिला शेतकरी गटांनाप्रकल्प खर्चाच्या 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...