Friday, May 20, 2022

 नांदेड जिल्ह्यात 887 इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी

 

·         इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल करु नये,

·         सुरक्षेच्या दृष्टिने इलेक्ट्रीक वाहनांची विशेष तपासणी मोहिम 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यात पर्यावरण पूरक धोरण राबविण्याचे निश्चित केले आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण-2021 लागू करण्यात आले आहे. या धोरणानुसार ई-बाईक्स व ई-वाहने यांना या करातून सुट देण्यात आली आहे. राज्यात 66 हजार 482 वाहनांची नोंदणी झाली असून नांदेड जिल्ह्यात एकूण 887 इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने दिली आहे.

वाहन उत्पादक, वितरक नागरीकांनी अशा वाहनांमध्ये अनधिकृत बदल करु नयेत जर अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा वाहनांची तसेच अशी वाहने उत्पादीत करणारे उत्पादक विक्री करणवितरक यांच्याविरुध्द विशेष तपासणी मोहिम राज्याच्या सर्व जिल्हयांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित वाहन उत्पादक, वाहन वितरक वाहनधारक यांचेविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 तसेच भारतीच दंड संहितेअंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. वाहन उत्पादक, विक्रेते नागरीकांनी  याची दखल घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.    

केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 2 (u) मध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याखा दिली असून त्यानुसार 250  वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांचा वेग ताशी 25 किलोमीटर पेक्षा कमी आहे. अशा ई-बाईक्सना सुट देण्यात आली आहे. वाहन उत्पादन करणाऱ्या उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहन प्रकाराची चाचणी ही केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 126 मध्ये विहित केलेल्या मान्यताप्राप्त संस्था जसे ARAI, ICAT, CIRT इत्यादी या संस्थेकडून टाईप Approval टेस्ट रिपोर्ट घेणे अनिवार्य आहे. अशा प्रमाणपत्राच्या आधारे परिवहन आयुक्त कार्यालय अशा वाहनांना नोंदणीतून सूट देते. तसेच संबंधित वाहन उत्पादकास व राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना याबाबत कळविले आहे.   

काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बॉईक्सची विक्री करतात. तसेच ज्या ई-बाईक्सना वाहन उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे अशा वाहनांमध्ये बेकादेशीर बदल करून अशा वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅटपेक्षा जास्त करतात अथवा वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा अधिकची करतात. वास्तविक अशा वाहनांची नोंदणी नसल्यामुळे त्यांना वाहन चालक अनुज्ञप्तीची देखील आवश्यकता नाही. त्यामुळे अशाप्रकारे बेकायदेशीर बदल करून वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ई-बाईक्सला आग लागून अपघात होत असल्याच्या घटना निर्देशनास आल्या आहेत.  या संदर्भाने प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांनाप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा नागरीकांनी करावी अशी वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वाहन वितरक उत्पादक यांचकडे मान्यताप्राप्त संस्थेचा Type Approval Test Report परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खात्री करावी, असेही आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...