Tuesday, February 15, 2022

 राष्ट्रीय लोकअदालतीचे 12 मार्चला आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार दिनांक 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये तसेच कौटुंबिक, कामगार व सहकार न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.एस.रोटे यांनी  केले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील मुख्यालयासह   सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये लोक अदालतीचे आयोजन असून यामध्ये  न्यायालयील दिवाणी, फौजदारी,एनआय.ॲक्टची प्रकरणे,बँकेची कर्ज वसुली  प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे,कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, इलेक्टीसीटी ॲक्टची समझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्यांची प्रलंबित अथवा दाखल पूर्ण प्रकरणे या लोक अदालतीमध्ये असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी प्राधिकरण कार्यालय तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. 

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व सन्मानीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी,भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोठ्या संख्येने प्रकरणाची तडजोड होण्यासाठी पक्षकार व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे  सहभागी होवून प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे  सचिव  आर.एस.रोटे  यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...